अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट?

By admin | Published: January 25, 2016 01:57 AM2016-01-25T01:57:06+5:302016-01-25T01:57:06+5:30

राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली.

President's rule in Arunachal Pradesh? | अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट?

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट?

Next

नवी दिल्ली : राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची अरुणाचलमधील सत्ताधारी काँग्रेसने तीव्र शब्दांत निंदा केली असून ही राजकीय असहिष्णुता असल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली गेली. गतवर्षी १६ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात राजकीय संकट चालून आले. काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपाचे ११ आणि दोन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन एका अस्थायी ठिकाणी अधिवेशन भरवत, विधानसभाध्यक्ष नबाम रेबिया यांच्यावर ‘महाभियोग’ चालवला होता.

Web Title: President's rule in Arunachal Pradesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.