राष्ट्रपती भवानाचे रुपांतर लोक भवनात झाले - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 09:50 PM2017-07-24T21:50:40+5:302017-07-24T21:50:40+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवानाचे रुपांतर लोक भवनात झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवानाचे रुपांतर लोक भवनात झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कौतुक केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या "सिलेक्टेड स्पीचेस" या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला भरपूर फायदा होणार आहे. मला विश्वास आहे की, त्यांच्यासोबत कोणीही काम केले असेल, तर त्यांना सुद्धा असाच अनुभव आला असेल. ज्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत चर्चा व्हायची, त्यावेळी त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले आहे. तसेच, सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याचबरोबर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अत्यंत हुशार आणि असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवानाचे रुपांतर लोक भवनात झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यानंतर नवे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे शेवटचे भाषण झाले. यावेळी त्यांनी समाज हिंसामुक्त व्हायला हवा, केवळ अहिंसक समाजच सर्वांची सुरक्षा आणि लोकशाही सुनिश्चित करू शकतो. अहिंसक समाजच भारताचे हित साध्य करु शकतो. देशातील पर्यावरणाची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. भारताची विविधता टिकवून ठेवा. संस्कृती, विश्वास आणि भाषा देशाची एक खास ओळख बनविते. भारताची आत्मा विविधता आणि सहिष्णूतामध्ये आहे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही, असे सांगितले. तसेच, त्यांनी आगामी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे आभार मानले.
Under President Pranab Mukherjee, Rashtrapati Bhavan became a "Lok Bhavan" : PM Narendra Modi pic.twitter.com/m0cf9nVL3H
— ANI (@ANI_news) July 24, 2017