एनजीटीच्या विरोधात प्रेस कौन्सिल लढणार

By admin | Published: January 20, 2017 04:45 AM2017-01-20T04:45:40+5:302017-01-20T04:45:40+5:30

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृत्तपत्रांना पूर्ण पानाची जाहिरात घेण्यास बंदी घालावी

The Press Council will fight against the NGT | एनजीटीच्या विरोधात प्रेस कौन्सिल लढणार

एनजीटीच्या विरोधात प्रेस कौन्सिल लढणार

Next


नवी दिल्ली : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृत्तपत्रांना पूर्ण पानाची जाहिरात घेण्यास बंदी घालावी, अशी भूमिका राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने (एनजीटी) घेतली असून, प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) सदस्यांनी या भूमिकेला आव्हान द्यायचा निर्णय घेतला असून आव्हान वकिलामार्फत दिले जाईल.
कौन्सिलचे वरिष्ठ सदस्य एच.एन. कामा यांनी गुरुवारी येथे सांगितले की, एनजीटीची भूमिका ही वृत्तपत्र स्वातंत्र्याविरोधात असून, तिच्याशी कायदेशीर मार्गांनी लढू.
एनजीटी आपली भूमिका कायम ठेवणार असेल, तर एनजीटी व पीसीआय यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र बनेल. नोटाबंदीचा फटका प्रसारमाध्यमांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बसला असताना लोकांचा आवाज उठवणे त्यांना कठीण होईल. एनजीटीच्या भूमिकेमध्ये सरकार हस्तक्षेप करणार की नाही, हे समजले नाही; परंतु हा प्रश्न संसदेच्या आगामी अधिवेशनात उपस्थित होईल. एनजीटीच्या भूमिकेविरोधात पीसीआय एकवटली आहे.

Web Title: The Press Council will fight against the NGT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.