2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: May 27, 2024 04:05 PM2024-05-27T16:05:38+5:302024-05-27T16:07:53+5:30

शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत

Pressure on BJP to repeat 2014 performance Meeting of top leaders including PM Modi and Amit Shah | 2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

संतोष सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात २०१४च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर प्रचंड दबाव आहे. शेवटच्या टप्प्यात, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. यात, खुद्द पंतप्रधाननरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. सातव्या टप्प्यात यूपीमध्ये एकूण १४४ उमेदवार  रिंगणात आहेत. २०१४ मध्ये या १३ पैकी भाजपने १२ जागा जिंकल्या होत्या. तर उरलेली एक जागा भाजपच्या मित्र पक्षानेच ताब्यात घेतली होती. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीत १३ पैकी १३ जागा भाजप आघाडीच्या वाट्याला गेल्या होत्या. मात्र, २०१९च्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागा एडीएला मिळाल्या होत्या.

सर्व ताकद पणाला लावली

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या २०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे उत्साही झालेल्या पक्षाने पुन्हा एकदा सर्व १३ जागा जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. सहाव्या टप्प्यातील १४ जागांचे मतदान पार पडताच भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष शेवटच्या टप्प्यात या जागांवर केंद्रित झाले आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी २५ मेरोजी घोसी येथे सभा घेतली असून, पुढील तीन दिवसांत ते मिर्झापूर, मउ आणि देवरिया येथे मोठ्या सभा घेणार आहेत. 

अतिआत्मविश्वासात राहू नका

भले मतदारसंघात भाजपसाठी पोषक वातावरण असेल, तरीही कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वासात न राहण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे. विशेषतः पन्नाप्रमुख म्हणून कामगिरी बजावणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपने विशेष जबाबदारी सोपवली आहे. बूथप्रमुखांवरही भाजप नेतृत्वाने मतदारांच्या संख्येचे टार्गेट निश्चित केल्याचे समजते.

३ लोकसभांमध्ये १३ जागांवर काय झाले?

पक्ष    २०१९    २०१४    २०१९ 
भाजप    ०९    १२    ०३ 
बसप    ०२    ००    ०३ 
सपा    ००    ००    ०५ 
काँग्रेस    ००    ००    ०२ 
अपक्ष    ०२    ०१    ०० 
एकूण    १३    १३    १३

तीन निवडणुकांमध्ये भाजपचे यश
भाजप  जागा  मते (%)

२०१९    ६२    ४९.९८ 
२०१४    ७१    ४२.६४ 
२००९    १०    १७.५ 

Web Title: Pressure on BJP to repeat 2014 performance Meeting of top leaders including PM Modi and Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.