‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 07:54 PM2024-10-09T19:54:15+5:302024-10-09T19:54:45+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत.
उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. अरुण कुमार यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे. सुंदर तरुणींनी इथे थांबावं, बाकीच्यांनी बीए, बीएससी करावं किंवा घरी जावं, असा सल्ला अरुण कुमार यांनी दिल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला. त्यानंतर संतप्त विद्यार्थिनींसह एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. प्रकरण वाढताच शिक्षण मंत्री आशिष पटेल यांनी अरुण कुमार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
ही घटना मेरठमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या ७८ विद्यार्थिनी एकाचवेळी नापास झाल्या होत्या. बहुतांश विद्यार्थिनींना शून्य किंवा त्याच्या आसपाचेच गुण मिळाले होते. हा निकाल पाहून अनेक विद्यार्थिनींना धक्का बसला होता. कमी गुण मिळाले असते तरी चाललं असतं मात्र बहुतांश विद्यार्थिनींना जाणीवपूर्णक शून्य गुण देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
दरम्यान, एचओडी अरुण कुमार यांना काही आक्षेपार्ह टिप्पण्यादेखील केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. सुंदर मुलींनी येथे थांबावं बाकीच्यांना बीएससी करावं,असे अरुण सिंह यांनी सांगितल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला. त्यावरून कॉलेजमध्ये वादाला तोंड फुटलं होतं. तसेच विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. तसेच दोषी शिक्षकाला हटवण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी तांत्रिक शिक्षणमंत्री आशिष पटेल यांनी अरुण कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.