गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी त्याने पाठवला विमान अपहरणाचा मेल

By admin | Published: April 20, 2017 12:07 PM2017-04-20T12:07:19+5:302017-04-20T14:39:59+5:30

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विमान अपहरणाबाबत मेलवरून खोटी माहिती दिल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

To prevent girlfriends, he sent a mail to the plane hijacking | गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी त्याने पाठवला विमान अपहरणाचा मेल

गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी त्याने पाठवला विमान अपहरणाचा मेल

Next

 ऑनलाइन लोकमत

 हैदराबाद, दि. 20 - मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विमान अपहरणाबाबत मेलवरून खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी पेशाने व्यावसायिक  असून, त्याने आपल्या प्रेयसीने मुंबई आणि गोवा  येथे फिरायला जाण्याचा विचार लांबणीवर टाकावा म्हणून हा खोडसाळपणा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

एम. वास्मी कृष्णा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो हैदराबादमधील मियापूर परिसरातला रहिवासी आहे.  त्याने 15 एप्रिल रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विमान अपहरणाची माहिती देणारा मेल पाठवला होता. दरम्यान,  हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सने आज सकाळी विमान अपहरणाचा खोटा मेल पाठवल्याच्या आरोपी खाली त्याच्यावर अटकेची कारवाई केली.   
 
वस्मी याची नुकतीच चेन्नईतील एका महिलेसोबत फेसबूकवरून ओळख झाली होती.  या महिलेने मुंबई  आणि गोवा येथे फिरायला घेऊन जाण्याची इच्छा वस्मीकडे व्यक्त केली. त्यासाठी तिने वस्मीला 16 एप्रिलला मुंबईत येणाऱ्या विमानाचे तिकीट खरेदी करण्यास तसेच आपणास मुंबई येथे भेटण्यास सांगितले होते. मात्र वस्मीकडे पुरेसे पैसे नसल्याने त्याने त्या महिलेस चेन्नई ते मुंबई प्रवासाचे खोटे तिकीट पाठवले. तसेच सहा व्यक्ती मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून विमान अपहरण करण्याच्या तयारीत असल्याचे ऐकल्याचा मेल हैदराबाद येथून मुंबई पोलिसांना पाठवला होता, अशी माहिती हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सने दिली. आपली मैत्रिण विमानतळावर जाऊ नये याची खात्री करून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, असेही पोलिसांनी सांगितले. 
 
( विमान अपहरणाची धमकी, विमानतळांवर हायअलर्ट )
 
 
दरम्यान,  रविवारी विमानाचे अपहरण केले जाणार असल्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबईसह चेन्नई आणि हैदराबाद विमातळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. या तीनही विमानतळ परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता.  मात्र चौकशीमध्ये हा मेल खरा नसून खोडसाळपणा असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर अटकेची कारवाई केली.  
 

Web Title: To prevent girlfriends, he sent a mail to the plane hijacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.