मानवी साखळी करून हिंसक जमावाला रोखले, मुस्लिम तरुणांनी मंदिर वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:30 PM2020-08-12T13:30:32+5:302020-08-12T13:38:14+5:30
सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती.
बंगळुरू - सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काल रात्री बंगळुरूमध्ये दंगल उसळली होती. या दंगतील हिंसक जमाव आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती. मात्र काही मुस्लिम तरुणांनी मंदिराच्या आवारात मानवी साखळी करून हिंसक जमावापासून मंदिराचे रक्षण केले.
या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. बंगळुरूमधील पुलकेशीनगर परिसरात मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका पोस्टवरून जमाव भडकला होता. त्यांनी आक्रमक होत काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करून मोडतोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आमदाराच्या निवास्थानाजवळ मोठ्या संख्येने जमाव जमला होता, त्यांनी मोडतोड केली. हल्लेखोरांनी डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाणे परिसरातही जोरदार आंदोलन केले. याचदरम्यान, जमावाने डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली. मात्र जागरुक असलेल्या काही मुस्लिम तरुणांनी आक्रमक होत असलेल्या जमावाला मानवी साखळी करून मंदिराजवळ जाण्यापासून रोखले.
#WATCH Karnataka: A group of Muslim youth gathered and formed a human chain around a temple in DJ Halli police station limits of Bengaluru city late last night, to protect it from arsonists after violence erupted in the area. (Video source: DJ Halli local) pic.twitter.com/dKIhMjQh96
— ANI (@ANI) August 12, 2020
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सोशल मीडियावरील एका पोस्टवरून काल रात्री हिंसाचार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. यामध्ये 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तब्बल 110 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
बंगळुरू शहराचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. नवीन असं वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी