बाजारात बूटांची किंमत ७५०० पण कामगारांना जोडामागे मिळतात फक्त पाच रुपये
By admin | Published: April 26, 2016 01:22 PM2016-04-26T13:22:45+5:302016-04-26T15:33:54+5:30
बाजारात ब्रॅण्डेड वस्तू महागडया किंमतीला विकल्या जातात. त्यातून कंपन्यांना घसघशीत नफा मिळतो. पण प्रत्यक्षात या वस्तू बनवणा-यांना त्या तुलनेत मोबादला मिळतो ?
Next
ऑनलाइन लोकमत
चैन्नई, दि. २६ - बाजारात ब्राण्डेड वस्तू महागडया किंमतीला विकल्या जातात. त्यातून कंपन्यांना घसघशीत नफा मिळतो. पण प्रत्यक्षात या वस्तू बनवणा-यांना त्या तुलनेत मोबादला मिळतो ? फुटवेअर इंडस्ट्रीच्या कारभारावर नजर टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येते.
बडया ब्राण्डच्या चप्पला, बूटची किंमत हजारो रुपये आहे. पण त्या बनवणा-यांना दिवसाला मोबदला म्हणून फक्त काही रुपये मिळतात. भारत चामडयाच्या चप्पला, बूट निर्यात करणा-या देशांमध्ये जगात आठव्या स्थानावर आहे.
भारतात तामिळनाडूमध्ये बनवल्या जाणा-या चप्पला, बूट युरोपियन बाजारपेठेमध्ये ४० ते १०० युरो म्हणजे दोन ते साडेसात हजार रुपयांना विकले जातात. पण तामिळनाडूमध्ये ज्या महिला हे काम करतात त्यांना एका जोडामागे फक्त पाच रुपये मिळतात. या महिलांना नोकरीची कोणतीही सुरक्षितता नसून, कुठलेही अन्य लाभ मिळत नाहीत.
त्या जे काम करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या महिला बूट शिवण्याचे काम करतात तरीही त्यांना कारखान्यातील अधिकृत कर्मचा-याचा दर्जा मिळालेली नाही. या महिला दिवसाला १६ जोड शिवतात. अंगमेहनतीच्या या कामाचे महिन्याकाठी त्यांना साडेचारहजार रुपये मिळतात.