मुगाचे भाव आठ हजारवरून साडेचार हजारांपर्यंत घसरले आवकेत सतत वाढ : आवक सुरू होताच भाव पाडले

By admin | Published: August 31, 2016 09:44 PM2016-08-31T21:44:47+5:302016-08-31T21:44:47+5:30

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १२३ क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास कमाल ४४५० रुपयांपर्यंत क्विंटलमागे भाव मिळाला. यातच १५ दिवसांपूर्वी मुगाला आठ हजार भाव होता. आवक वाढताच मुगाचे भाव व्यापारी मंडळीने पाडले आहेत.

The price of the coins decreased from eight thousand to four hundred thousand. Continuous increase in demand: After the commencement of arrival, | मुगाचे भाव आठ हजारवरून साडेचार हजारांपर्यंत घसरले आवकेत सतत वाढ : आवक सुरू होताच भाव पाडले

मुगाचे भाव आठ हजारवरून साडेचार हजारांपर्यंत घसरले आवकेत सतत वाढ : आवक सुरू होताच भाव पाडले

Next
गाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १२३ क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास कमाल ४४५० रुपयांपर्यंत क्विंटलमागे भाव मिळाला. यातच १५ दिवसांपूर्वी मुगाला आठ हजार भाव होता. आवक वाढताच मुगाचे भाव व्यापारी मंडळीने पाडले आहेत.
भाव पाडल्याने अनेक शेतकरी अमळनेर, चोपडा, सेंधवा येथील बाजार समितीमध्ये आपला मूग विक्रीसाठी नेऊ लागले आहेत. जळगाव बाजार समितीमध्ये मूग नेण्यास अनेक शेतकरी नाक मुरडत आहेत.

इतर कडधान्याची आवक शून्य
इतर कडधान्याची आवक मात्र शून्य आहे. तूर, उडीद यांची कुठलीही आवक होत नसल्याने त्यांचे भावही जाहीर झालेले नाहीत किंवा त्यांची खरेदी शेतकर्‍यांकडून सुरू नाही.

तुरीची आवक नोव्हेंबरमध्ये
तुरीची आवक नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होईल. यंदा पीक चांगले असून, जिल्ह्यात तब्बल १५ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत लागवडीमध्ये ११ हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

पारोळ्यात विक्रमी भाव, पण घसरण
पारोळा येथे बाजार समितीमध्ये पंधरवड्यापूर्वी मुगाला ८३०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. त्यानंतर भाव हळूहळू कमी झाले.

आवक वाढतीच
जळगाव बाजार समितीमध्ये मंगळवारी १०६ क्विंटल मुगाची आवक झाली होती. तर बुधवारी १२३ क्विंटल एवढी आवक झाली. तर सोमवारी जवळपास ९५ क्विंटल एवढी आवक झाली होती. याचा अर्थ आवकेत दिवसागणिक वाढ होत असून, भावही कमी होत आहेत.

मुगाच्या भावांमधील घसरण
(भाव क्विंटलमागे)

२४ ऑगस्ट- ४८२४
२५ ऑगस्ट- सु˜ी
२६ ऑगस्ट- ४७६१
२७ ऑगस्ट- ४७००
२८ ऑगस्ट- ४५००
२९ ऑगस्ट- ४५००
३० ऑगस्ट ४४५०
३१ ऑगस्ट- ४४५० ते ४१५१ (ओला माल)
(माहिती स्त्रोत : कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव)


डाळ विक्री केंद्र बंद
गोरगरीब, गरजू ग्राहकांना कमी दरामध्ये तूर डाळ मिळावी यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला दाल मिल असोसिएशनने रास्त भाव तूर डाळ विक्री केंद्र बाजार समितीच्या आपल्या दुकानात सुरू केले होते. हे केंद्र आठवडाभरापूर्वीच बंद झाले आहे. एका ग्राहकास किमान दोन किलो डाळ दिली जात होती. सध्या रेशनवर ८० रुपये किलो दरात डाळ मिळत आहे. तर या केंद्रात १०० ते १२० रुपये किलो दरात तूर डाळ ग्राहकांना दिली जात होती.

Web Title: The price of the coins decreased from eight thousand to four hundred thousand. Continuous increase in demand: After the commencement of arrival,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.