विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ३७.५० रु.ने वाढ
By admin | Published: November 1, 2016 05:48 AM2016-11-01T05:48:01+5:302016-11-01T05:48:01+5:30
इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने(आयओसी) सोमवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ३७.५० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली : सरकारचे नियंत्रण असलेल्या इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने(आयओसी) सोमवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ३७.५० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अनुदानित सिलिंडरची किंमतदेखील दोन रुपयाने वाढविली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.
दरवर्षी अनुदानित १२ सिलिंडर मिळविणाऱ्या ग्राहकांसाठी विनाअनुदानित सिलिंडर वरील दरात बाजारात उपलब्ध असेल. आज मंगळवारपासून १४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित सिलिंडर दिल्लीत ५२९.५० रु.त उपलब्ध होणार आहे. कोलकाता येथे हे सिलिंडर ५५१, मुंबईत ५३१ आणि चेन्नईत ५३८.५० रुपयांचे असेल, असे आयओसीच्या अधिकृत वृत्तात म्हटले आहे. अनुदानित सिलिंडरची किंमतदेखील दोन रुपयाने वाढल्यामुळे असे सिलिंडर दिल्लीत ४३०.६४ रु.त, कोलकाता येथे ४३२.६४, मुंबईत ४६०.२७ आणि चेन्नई येथे ४१८.१४ रु.त उपलब्ध होईल. (वृत्तसंस्था)