रोमियो नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढायचा - प्रशांत भूषण

By admin | Published: April 2, 2017 02:02 PM2017-04-02T14:02:24+5:302017-04-02T14:02:24+5:30

प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली आहे.

Priceless Bhushan to get rid of women, but not Ramo - Prashant Bhushan | रोमियो नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढायचा - प्रशांत भूषण

रोमियो नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढायचा - प्रशांत भूषण

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टवाळखोरांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेलं एंटी रोमियो स्क्वॉड हे पथक सध्या चर्चेत आहे. यावरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी एंटी रोमियो स्क्वॉडवर टीका केली आहे. 
 
प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली आहे.  रोमियोने केवळ एका महिलेवर प्रेम केलं होतं तर कृष्ण छेडछाड करण्यासाठी प्रसीद्ध होता. आदित्यनाथ यांच्यात एंटी रोमियो स्क्वॉडचं नाव बदलून एंटी कृष्ण स्क्वॉड  करण्याची हिम्मत आहे का असं ट्विट भूषण यांनी केलं आहे. प्रशांत भूषण यांच्या या ट्विटनंतर मोठा वाद सुरू होऊ शकतो. कारण, कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाची तुलना त्यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील रोमियोसोबत केली आहे. 
 
उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी एंटी रोमियो स्क्वॉडची स्थापना केली. पण स्थापना झाल्यापासून या पथकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक सवाल उपस्थित झाले. सहमतीने केवळ चर्चा करणा-या अनेक महिला-पुरूषांना या पथकाने नाहक त्रास दिला तर भावा-बहिणीला उचलून पोलीस स्थानकात घेऊन गेले अशा अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या.  

Web Title: Priceless Bhushan to get rid of women, but not Ramo - Prashant Bhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.