भाजीपाला वधारतोय लसूण, साखरेचे दर चढेच : डाळीच्या दरातील घसरण कायम
By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:08+5:302017-01-23T20:13:08+5:30
कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात थोडी वाढ झाली असून प्रमुख भाज्यांचे दर काही प्रमाणात वधारलेच दिसत आहे. लसूण, साखरेचे दर चढेच राहिले असून डाळीचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत. फळ माकेर्ेटमध्ये आवक व उठाव यात अजूनही सुधारणा न झाल्याने दर स्थिर आहेत.
Next
क ल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात थोडी वाढ झाली असून प्रमुख भाज्यांचे दर काही प्रमाणात वधारलेच दिसत आहे. लसूण, साखरेचे दर चढेच राहिले असून डाळीचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत. फळ माकेर्ेटमध्ये आवक व उठाव यात अजूनही सुधारणा न झाल्याने दर स्थिर आहेत. दोन महिने भाजीपाल्याचे दर अक्षरश: मातीमोल झाले होते. यंदा पाऊस चांगला असल्याने उत्पादन वाढले आहे, त्यात चलन तुटवड्यामुळे सर्वच बाजारपेठा थंड झाल्याने भाजीपाल्याचे दर एकदम खाली आले. गेले आठवड्याच्या तुलनेत सध्या भाजीपाल्याचे दर काहीसे बरे आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, गवार, कारली, भेंडीचे दर वधारले आहेत. टोमॅटोचा दर चार रुपये किलो होता. त्यात सुधारणा होऊन सध्या दहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ओली मिरचीच्या दरातही थोडी वाढ झाली असून घाऊक बाजारात ३० रुपयांपर्यंत किलोचा दर आहे. गावठी वरणा येत असल्याने दरात थोडी घसरण दिसत असली तरी ४० रुपयांपर्यंत दर स्थिर राहिला आहे. फ्लॉवरची आवक वाढतच आहे, परिणामी दरात सुधारणा झालेली नाही. किरकोळ बाजारात दहा रुपयाला मोठा गड्डा मिळत आहे. डाळींच्या दरात घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात ८५ तर हरभरा डाळ शंभर रुपये दर राहिला आहे. मूग, मूगडाळ, उडिदडाळीचे दर स्थिर असून साखरेच्या दर मात्र हळू-हळू वाढू लागले आहेत. फळ मार्केटमध्ये फळांची आवक चांगली आहे. माल्टा, संत्री, द्राक्षे, सफरचंद, बोरांची आवक मोठ्या प्रमाणात आहे, पण उठाव होत नसल्याने दर स्थिर आहेत. स्ट्रॉबेरीची आवकही हळू-हळू वाढू लागली आहे. कांद्याची आवक कमीगेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. घाऊक बाजारात १५ ते ९० रुपये दहा किलोपर्यंत दर असला तरी सरासरी दरात ५ रुपयांची वाढ दिसत आहे. बटाट्याचे मात्र स्थिर आहेत. ----------------------------------------------------गूळ चांगलाच तेजीतगुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी आठवड्याला दरात वाढ होत आहे. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. एक किलो बॉक्सचा दर ५५०० रुपये झाला आहे. ------------------------------------------------खाद्यतेलाचे प्रतिकिलोचे दर असे :-सरकी तेल-८२, सूर्यफूल-९०, शेंगतेल-१४० रुपये -------------------------------------------------------फळांचे दर असे : संत्री -५०, मोसंबी-६०, डाळींब-५०, सफरचंद-७०,द्राक्षे-५० ते ७०, बोरे -२० रुपये.-----------------------------------------------------------------(राजाराम लोंढे) (फोटो उपलब्ध झाल्यास देतो......)