काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधानांनी जाहीर केले ८० हजार कोटींचे पॅकेज

By admin | Published: November 7, 2015 01:15 PM2015-11-07T13:15:16+5:302015-11-07T13:28:26+5:30

'भूतलावरील स्वर्ग' अशी ख्याती मिरवणा-या जम्मू-काश्मीरच्या समग्र विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

Prime Minister announces Rs 80,000 crore package for Kashmir's development | काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधानांनी जाहीर केले ८० हजार कोटींचे पॅकेज

काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधानांनी जाहीर केले ८० हजार कोटींचे पॅकेज

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ७ - 'भूतलावरील स्वर्ग' अशी ख्याती मिरवणा-या जम्मू-काश्मीरच्या समग्र विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. श्रीनगरमधील 'शेर-ए-काश्मीर' स्टेडियममध्ये शनिवारी दुपारी झालेल्या सभेत लाखोंच्या समुदायासमोर पंतप्रधानांनी ही घोषणा केली. काश्मीरने आत्तापर्यंत खूप काही भोगलं आहे, अनेक पिढ्यांची स्वप्नं चिरडली गेली आहेत, मात्र आता मला काश्मीरल पुन्हा 'जन्नत' बनवायचे आहे, असे सांगत पंतप्रधानांनी काश्मीरच्या विकासाकरिता ८० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.  'सबका साथ सबका विकास' हाच आमचा मंत्र असून देशातील कोणताही भाग विकासापासून वंचित राहिल्यास माझं स्वप्नं अधुरं राहिल, त्यामुळे विकासासाठी देशातील सर्व जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन मोदींनी काश्मीरच्या जनतेला केले. 
काश्मीरचा स्वभाव हा भारतीयांसारखाच आहे, मला मुफ्ती साहेबांच्या बोलण्यावर आणि इथल्या जतनेवर विश्वास आहे. काश्मीरसाठी मला जगातील कोणाच्याही सल्ल्याची अथवा विश्लेषणाची गरज नाही. आपल्याला अटलजींच्या पावलांवर पाऊल टाकून चालायचे आहे. याच भूमीवर, याच मंचावर अटलीजींनी 'काश्मीरियत, लोकशाही आणि मानवता' या तीन मंत्राचा सल्ला दिला होता, तोच अनुसरून आपल्याला पुढे जायचे आहे. या तीन मंत्रांच्या खांबांवरच काश्मीरच्या विकासाचा डोलारा उभा राहणार आहे, असे मोदी म्हणाले. 
गे्या अनेक वर्षांपासून देशातील नागरिकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे, त्याच पर्यटकांची पावले काश्मीरकडे पुन्हा वळावीत यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही मोदी म्हणाले. 
 

 

Web Title: Prime Minister announces Rs 80,000 crore package for Kashmir's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.