जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुलसीभाई; टेड्रोस यांच्या मागणीनंतर दिले गुजराती नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:01 AM2022-04-21T07:01:27+5:302022-04-21T07:02:38+5:30
यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंड जुगनाऊथ आणि डॉ. घेब्रेयेसूस उपस्थित होते. ‘तुम्हाला तुलसीभाई असे हाक मारताना मला खूप छान वाटते’, असे मोदी म्हणाले.
गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसूस यांना त्यांच्याच मागणीवरून तुलसीभाई असे गुजराती नाव दिले. मोदी बुधवारी येथे महात्मा मंदिरात ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्नोव्हेशन समीटच्या उद्घाटनानंतर बोलत होते.
यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंड जुगनाऊथ आणि डॉ. घेब्रेयेसूस उपस्थित होते. ‘तुम्हाला तुलसीभाई असे हाक मारताना मला खूप छान वाटते’, असे मोदी म्हणाले.
टेड्रोस हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला सांगितले की, भारतीय शिक्षकांनी मला शिकविले आणि आज मी जो आहे तो त्यांच्यामुळेच. आज मी पक्का गुजराती झालो आहे. तुम्ही माझ्यासाठी नाव ठरवले आहे का? मग मी त्यांना गुजराती नाव तुलसीभाई म्हणेन. अनेक पिढ्यांनी तुळशीची पूजा केलेली आहे. लग्नातही तुम्ही तुळशीच्या झाडाचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आमच्यासोबत आहात, असेही मोदी म्हणाले.