'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 02:00 PM2024-10-27T14:00:12+5:302024-10-27T14:03:57+5:30

31 ऑक्टोबरपासून सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीवर्षाला सुरुवात होत आहे. तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला सुरुवात होईल," असे पंतप्रधान मोदी म्हटले. 

Prime Minister Modi mentioned Chhota Bheem, Motu-Patlu and Hanuman in Mann Ki Baat | 'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?

'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 115 वा अ‍ॅपिसोड पार पडला. यावेळी, आपल्याला बिरसामुंडा यांच्या जन्मस्थळाला भेट देता आली, हे आपल्यासाठी विशेष होते. तसेच, दोन महापुरुषांची150वी जयंती येत आहे. 31 ऑक्टोबरपासून सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीवर्षाला सुरुवात होत आहे. तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला सुरुवात होईल," असे पंतप्रधान मोदी म्हटले. 

मोटू-पतलू कार्टूनचा केला उल्लेख -
मेक इन इंडियाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत ॲनिमेशन विश्वात एक नवी क्रांती आणेन. देशात सर्जनशीलतेची लाट सुरू आहे. जेव्हा छोटा भीम टीव्हीवर यायचे तेव्हा मुलं अत्यंत आनंदी होत असत. आपल्या इतर ॲनिमेटेड मालिका मोटू-पतलू, हनुमान जगभरात लोकप्रिय आहेत. भारताचे ॲनिमेशन जगभरात लोकप्रिय आहे. उद्या वर्ल्ड अ‍ॅनिमेशन डे साजरा होत आहे. चला भारताला सशक्त करुया."

मोदी म्हणाले, "आज ॲनिमेशन क्षेत्राने एका अशा उद्योगाचे रूप धारण केले आहे, जे इतर उद्योगांनाही बळकटी देऊ लागले आहे. जसे की, सध्या VR पर्यटन अत्यंत प्रसिद्ध होताना दिसत आहे. आपण व्हर्च्युअल टूरद्वारे अंजता लेणींना भेट देऊ शकता. कोणार्क मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये फिरू शकता अथवा वाराणसीच्या घाटांचा आनंद घेऊ शकतो.

मोदी पुढे म्हणाले, "पर्यटन स्थळांचा व्हर्चुअल टूर लोकांच्या मनात कुतुहल निर्माण करत आहे. या क्षेतात आज अ‍ॅनिमेटर्सबरोबरच स्टोरी टेलर्स, लेखक, व्हाइस-ओव्हर एक्सपर्ट, म्यूझिशियन, गेम डेव्हलपर्स, व्हीआर आणि एआर एक्सपर्ट आदींची मागणीही सातत्याने वाढत आहे. यामुळे मी भारतातील तरुणांना सांगेन की, आपण आपल्या क्रिएटिव्हिटीचा विस्तार करा. कदाचित जगातील पुढील सुपर हिट अ‍ॅनिमेशन आपल्या कम्प्यूटरमधून निघेल."

याशिवाय, "आता आत्मनिर्भर भारत अभियान, एक जन अभियान बनत आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करत आहोत. उदाहरणार्थ, आपण याच महिन्यात लडाखच्या हानलेमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या इमॅजिंग टेलीस्कोप MACE चे उद्घाटनही केले. जे 4300 मीटर ऊंचावर आहे."
 

Web Title: Prime Minister Modi mentioned Chhota Bheem, Motu-Patlu and Hanuman in Mann Ki Baat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.