पंतप्रधान मोदी तीन देशांच्या भेटीसाठी रवाना इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूरला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:11 AM2018-05-30T05:11:17+5:302018-05-30T05:11:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियाला रवाना झाले. या देशात ते पहिल्यांदा जात आहेत. याशिवाय ते मलेशिया व सिंगापूर याही देशांना भेट देणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियाला रवाना झाले. या देशात ते पहिल्यांदा जात आहेत. याशिवाय ते मलेशिया व सिंगापूर याही देशांना भेट देणार आहेत.
इंडोनेशिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दोन्ही देशांत सागरी साह्य, व्यापार व गुंतवणुकीसह विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी जकार्ता येथे पोहोचतील. तेथील भारतीयांसमोर त्यांचे भाषणही होणार आहे. जकार्तामध्ये पंतप्रधान बुधवारी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेतील, असे भारताचे इंडोनेशियातील राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी सांगितले. इंडोनेशियन चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या उद्योजकांची बैठक, भारतीय उद्योगांसह विविध बैठकांमध्ये नरेंद्र मोदी व जोको विडोडो सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये उद्योगक्षेत्रात स्नेहपूर्ण संबंध वाढावेत, यासाठी दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.