पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
By admin | Published: April 14, 2017 09:49 AM2017-04-14T09:49:30+5:302017-04-14T10:02:52+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती आहे. या निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही ट्विट करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नागपुरात दाखल होत आहेत. याबाबत ट्विट करताना मोदी यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जोडल्या गेलेल्या पवित्र दीक्षाभूमीवर जाऊन आपण प्रार्थना करणार आहोत.
मोदींनी असेही सांगितले की, नागपुरात अनेक विकासकामांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या विकास योजनांत आयआयटी, आयआयएम, एम्स आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचाही समावेश आहे. त्यानंतर मोदी एका सभेलाही संबोधित करणार आहेत.
मोदी यांनी म्हटले आहे की, डिजिधन मेळ्याच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. डिजिधन व्यापार योजना व लकी ग्राहक योजनेच्या विजेत्यांना बक्षीस वितरीत करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील मजबूत, समृद्ध आणि सर्वसमावेशक भारत बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Tributes to venerable Dr. Babasaheb Ambedkar on Ambedkar Jayanti. Jai Bhim. अम्बेडकर जयंती के पावन अवसर पर पूज्य बाबासाहेब को नमन। #जयभीम ! pic.twitter.com/XVC0TNtufV
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2017