ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे पंतप्रधान मोदी पहिले परदेशी नेते
By admin | Published: June 24, 2017 08:22 AM2017-06-24T08:22:40+5:302017-06-24T09:08:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. जवळपास 5 तासांची ही भेट असणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही नेते दुपारी 3.30 वाजता भेटतील त्यानंतर मीडियासाठी काही वेळ दिला जाणार आहे.
त्यानंतर प्रतिनिधी पातळी स्तरावरील चर्चा होईल, त्यानंतर आदरातिथ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
या दिवसाचा शेवट रात्री व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभानं होणार आहे. दरम्यान मोदी अमेरिका दौ-यावर जाणारे पहिले परदेशी नेते आहेत जे ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते दहशतवादासंदर्भातील समस्या, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणातील मदत आणि आशिया-पॅसिफिकमध्ये भारताची भूमिका वाढवण्यासाठी मदत करण्यासंदर्भात चर्चा करू शकतात. शिवाय, चर्चेबाबत दोन्ही नेते मीडियामध्ये संक्षिप्त स्वरुपात माहिती देतील.
चर्चा केल्यानंतर ते संयुक्त निवेदन देतील मात्र मीडियाच्या प्रश्नांना स्वतंत्र उत्तर देणार नाहीत. सोमवारी 26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. या दौ-यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्विटदेखील केले आहे. माझ्या अमेरिका दौ-याचं मुख्य लक्ष्य आपल्या देशांमधील संबंध बळकट करणं हा आहे. भारत- अमेरिकेमधील मजबूत संबंधांचा फायदा आपल्या देशांना आणि जगाला आहे.
Prime Minister Narendra Modi departs for his three-nation visit to Portugal, US and Netherlands. pic.twitter.com/hqHLIPSiCf
— ANI (@ANI_news) June 24, 2017
My USA visit is aimed at deepening ties between our nations. Strong India-USA ties benefit our nations & the world. https://t.co/UaF6lbo1ga
— Narendra Modi (@narendramodi) June 23, 2017