पंतप्रधान मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया, सिंगापूरच्या दौ-यावर
By admin | Published: November 19, 2015 11:54 AM2015-11-19T11:54:39+5:302015-11-19T11:59:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ नोव्हेंबरपासून सिंगापूर व मलेशियाच्या दौ-यावर जाणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ नोव्हेंबरपासून सिंगापूर व मलेशियाच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यादरम्यान पंतप्रधान दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (असीआन) तेराव्या शिखर परिषदेला व दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र खात्याचे सचिव (पूर्व) अनिल वधवा यांनी ही माहिती दिली. दोन्ही परिषदांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबर रोजी क्वालालंपूर येथे दाखल होतील. त्या परिषेदनंतर द्विपक्षीय भेटी झाल्यावर पंतप्रधान पुढे सिंगापूरला रवाना होतील.