पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांकडून मागितला कामाचा लेखाजोखा
By admin | Published: June 24, 2016 12:33 AM2016-06-24T00:33:58+5:302016-06-24T00:33:58+5:30
मोदी यांनी सहकारी मंत्र्यांकडे कामाचा लेखाजोखा मागितल्याचे वृत्त आहे. आगामी ३० जूनच्या बैठकीला ‘सेल्फ अॅप्रेजल’ अहवालानिशी हजर राहण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांकडे कामाचा लेखाजोखा मागितल्याचे वृत्त आहे. आगामी ३० जूनच्या बैठकीला ‘सेल्फ अॅप्रेजल’ अहवालानिशी हजर राहण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच मंत्र्यांकडे लेखाजोखा मागण्यात आला हे विशेष. सरकार पंजाब व उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करील, असे मानले जाते.
येत्या ३० जून रोजी बैठक होणार असून, या बैठकीत रालोआ मंत्री त्यांचे सेल्फ अप्रायझल अहवाल पंतप्रधानांना सादर करणार आहेत. सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या मंत्र्यांच्या कामाचा यात समावेश असेल. पंतप्रधान स्वत: या अहवालाचा आढावा घेणार असून, त्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते. ३० जूनच्या बैठकीत मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती घेतली जाऊ शकते, असे पक्षातील एका सूत्राने सांगितले. पंतप्रधान परिस्थितीत सुधारणा झाली आहे किंवा नाही याची नियमितपणे शहानिशा करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)