'जंगलराज वाले' महाकुंभबद्दल अपशब्द बोलतायत, राम मंदिरावरही...; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:41 IST2025-02-24T18:40:31+5:302025-02-24T18:41:58+5:30
कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्यांना बिहार कधीही माफ करणार नाही...

'जंगलराज वाले' महाकुंभबद्दल अपशब्द बोलतायत, राम मंदिरावरही...; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील भागलपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे 'किसान संमान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना 'लाडका मुख्यमंत्री' म्हणूनही संबोधले. याच बरोबर त्यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावरही निशाणा साधला.
कुंभमेळ्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. मात्र हे 'जंगलराज'वाले लोक कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलत आहेत. राम मंदिरावर चिडणारे लोक कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्यांना बिहार कधीही माफ करणार नाही. काही दिवसांपूर्वी लालू यादव म्हणाले होते, "कुंभमेळ्याचा काय अर्थ आहे, फालतू आहे कुंभ."
कुंभमेळ्याच्या काळात मंदराचलला येणे भाग्याची गोष्ट -
कुंभमेळ्यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "कुंभमेळ्याच्या काळात मंदराचलच्या या भूमीवर येणे ही भाग्याची गोष्ट आहे. या भूमीत श्रद्धा, वारसा आणि विकसित भारताचे सामर्थ्यही आहे. ही हुतात्मा तिलकमांझींची भूमी आहे. ही रेशीम नगरी देखील आहे. अशा पवित्र काळात, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे."
'शेतकऱ्यांचे कल्याण, ही एनडीएची प्राथमिकता' -
भागलपूरमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो की, विकसित भारताचे चार मुख्य खांब आहेत. हे आधारस्तंभ म्हणजे, गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण. एनडीए सरकार, मग ते केंद्रात असो अथवा राज्यात, शेतकऱ्यांचे कल्याण ही आमची प्रथमिकता आहे.
'किसान कल्याण NDA की प्राथमिकता'
भागलपुर में पीएम मोदी ने कहा “मैंने लाल किले से कहा है कि विकसित भारत के चार मजबूत स्तंभ हैं. ये स्तंभ हैं- गरीब, किसान, महिला और नौजवान. NDA सरकार, चाहे केंद्र में हो या फिर प्रदेश में, किसान कल्याण हमारी प्राथमिकता है."