पंतप्रधान मोदींच्या गावातील सरकारी शाळांमध्येच नाहीत स्वच्छतागृहे
By admin | Published: February 27, 2016 11:03 AM2016-02-27T11:03:11+5:302016-02-27T11:26:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या गुजरातमधील वडनगर येथील सरकारी शाळांमध्ये मुला वा मुलींसाठी स्वच्छतागृहेच नसल्याची माहिती समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. २७ - संपूर्ण देशाच्या तुलनेत गुजरातमध्ये सर्वाधिक स्वच्छतागृह बांधल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या वडनगरमध्येच सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहं (शौचलये) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हीच परिस्थिती गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर या जन्मगावातही आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी किती सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नाही व त्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत? असा सवाल आमदार प्रल्हाद पटेल यांनी राज्यभेत विचारला होता. त्यासंबंधी उत्तर देताना राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्रसिह चुडासामा यांनी विजापूर व वडनगरमध्ये सरकारी शाळांत स्वच्छतागृहे नसल्याचे स्पष्ट केले.
२०१६-१७ या वर्षात ७ लाख स्वच्छतागृह बांधण्याचे गुजरात सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी ७८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिकृत माहितीनुसार, २०१२ मधील बेसलाईन सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये ७०, २९,१९९ कुटुंबे रहात असून त्यापैकी ३३,२१,०४७ घरांमध्ये शौचालये नाहीत. जून २०१५ पर्यंत सुमारे ६ लाख ४८ हजार ९८१ शौचालये बांधण्यात आली मात्र अद्याप २६ लाख ७२ हजार ०६६ शौचालयांचे बांधकाम बाकी आहे.