पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 07:43 AM2016-07-29T07:43:26+5:302016-07-29T08:05:50+5:30
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ सुरक्षा घ्यावी असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 29 - 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला होऊ शकतो. गुप्तचर खात्याने हल्ला होण्याची शक्यता वर्तवत नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं सागितंल आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ सुरक्षा घ्यावी असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. गुप्तचर खातं आणि विशेष सुरक्षा गटाने यासंबंधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत चर्चादेखील केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेला सल्ला नरेंद्र मोदींनी मान्य केल्यास ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मोदींच्या आसपास सुरक्षेचा मोठा फौजफाटा असेल. गतवर्षी नरेंद्र मोदींनी मोक्याच्या क्षणी बुलेटप्रूफ सुरक्षा न वापरता भाषण देण्याचा निर्णय घेतला होता.
नरेंद्र मोदींवर हल्ला होण्यामागे काश्मीर हिंसाचार किंवा सीमारेषेवरुन वाढती घुसखोरी फक्त हीच कारणे नसल्याचं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी मिळवलेल्या संभाषणात नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करत सुरक्षा भेदण्याची योजना आखण्यात आली आहे. तसंच इसीसचे वाढते हल्ले हादेखील चिंतेचा विषय असल्याचं अधिका-याने सांगितलं आहे.
गुप्ततर यंत्रणांनी एसपीजी आमि दहशतवादी विरोधी पथकांनी अगोदरच या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल कल्पना दिली आहे. देशभरात अनेक ठिकाणी करण्यात आले त्याप्रमाणे एकट्याने हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. अल-कायदा आणि इसीस लष्कर आणि पोलिसांच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती अगोदरच देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे.
माजी पंतप्रधान इंदिरां गांधींच्या हत्येनंतर बुलेटप्रूफ काचेतून पंतप्रधानांनी भाषण देण्याची प्रथा सुरु झाली होती. पण 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भाषण दिलं, तेव्हा त्यांनी ही प्रथा मोडत बुलेटप्रूफ काच नाकारली होती, आणि भाषण दिले होते.
इसीसव्यतिरिक्त अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद तसंच हिजबूल मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जेहादी-इस्लामी या दहशतवादी संघटना नरेंद्र मोदींवर हल्ला करु शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीजी, निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे एकूण 5 हजार जवान फक्त एकट्या लाल किल्ला परिसरात तैनात करण्यात आले आहेत. तसंच आकाशात नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने मदत घेतली जात आहे.