आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींची योगाला दांडी
By admin | Published: January 10, 2017 10:58 AM2017-01-10T10:58:00+5:302017-01-10T11:40:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेण्यासाठी योगा करण्याचा नियम मोडला.
Next
ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी न चुकता 'योगसाधना' नित्यनेमाने करतात. योगासना करण्याचा नियम त्यांनी आजपर्यंत कायम पाळला आहे. मात्र मंगळवारी आपल्या आई हीराबेन यांना भेटण्यासाठी त्यांनी हा नियम मोडला. याची माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन दिली.
त्याचं झालं असे की, 'गुजरात व्हायब्रंट' परिषदेसाठी नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आहेत. गुजरातमध्ये आल्यानंतर आईला भेटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यादरम्यान, त्यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून केवळ आईला भेटण्यासाठी योगा करणं टाळले आणि पहाटे पहाटे त्यांची पाऊले आईच्या घराकडे वळली.
मातृभेटीबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन सांगितले की, 'आज मी योगा केला नाही. मी आपल्या आईला भेटण्यासाठी गेलो होतो. सकाळ होण्यापूर्वी आईसोबत नाश्ता केला. तिच्यासोबत वेळ घालवल्याने मला खूप छान वाटत आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन 95 वर्षांच्या आहेत. लहान मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत त्या गांधीनगर येथे राहतात.
याआधीही गुजरात दौ-यावर आलेले असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या आईची भेट घेतली आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरही आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ते गुजरातमध्ये आले होते. त्यानंतर 66 व्या वाढदिवशीही नरेंद्र मोदींनी आई हीराबेन यांची भेट घेतली.
Skipped Yoga & went to meet mother. Before dawn had breakfast with her. Was great spending time together.
— Narendra Modi (@narendramodi) 10 January 2017
अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीकादरम्यान, नरेंद्र मोदींनी आईची भेट घेण्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. 'मी आपल्या आईसोबत राहतो. तिचा दररोज आशीर्वाद घेतो, मात्र याचा गाजावाजा करत नाही. राजकारणासाठी मी माझ्या आईला बँकेच्या रांगेतही उभे करत नाही. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सांगते की आपली वयोवृद्ध आई आणि धर्मपत्नीला स्वतःसोबत ठेवले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे, थोडे हृदय देखील मोठे करा.', असे ट्विट करत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या मातृभेटीवर टीका केली आहे.
मैं अपनी माँ के साथ रहता हूँ, रोज़ उनका आशीर्वाद लेता हूँ लेकिन ढिंढोरा नहीं पीटता। मैं माँ को राजनीति के लिए बैंक की लाइन में भी नहीं लगाता https://t.co/CT243GCiaC
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 10 January 2017
हिंदू धर्म और भारतीय संस्कृति कहती है कि आपको अपनी बूढ़ी माँ और धर्मपत्नी को अपने साथ रखना चाहिए। PM आवास बहुत बड़ा है, थोड़ा दिल बड़ा कीजिए https://t.co/CT243GTTzc
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 10 January 2017