पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:29+5:302021-03-20T06:53:10+5:30

नमग्याल हे लडाखचे लाेकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती माेदींकडून हाेत असल्याचा उल्लेख केला. 

Prime Minister Narendra Maedi ‘Incarnation of God’; Praise of BJP MPs | पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने

पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ‘ईश्वराचा अवतार’,  ‘युगपुरुष’ असा उल्लेख करून भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. माेदी देशाला याेग्य दिशेने नेत असल्याचे अरुणाचल प्रदेशचे भाजप सदस्य तापीर गाओ यांनी म्हटले, तर  खासदार जमयंग नमग्याल यांनी माेदींचा ‘युगपुरुष’ असा उल्लेख केला आहे. (Prime Minister Narendra Maedi ‘Incarnation of God’; Praise of BJP MPs)

नमग्याल हे लडाखचे लाेकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती माेदींकडून हाेत असल्याचा उल्लेख केला. 

इशान्येकडील राज्यांमधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांच्या समस्या साेडविल्याचा उल्लेख करून गाओ यांनी माेदींना ईश्वरीय अवतार असल्याचे म्हटले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान गाओ म्हणाले, माेदी हे मनुष्य नसून काेणाचातरी अवतार आहेत. ते देशाला याेग्य दिशेने नेत आहेत. अरुणाचल प्रदेश व इशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत विकासकामांचा उल्लेख गाओ यांनी यावेळी केला. माेदी सरकारने काेराेना महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांचा उल्लेखही गाओ यांनी केला. 

माेदींच्या नेतृत्वामध्ये भारताकडून १०० हून अधिक देशांना काराेनाच्या लसींचा पुरवठा हाेत आहे. हे निश्चितच काैतुकास्पद असल्याचे गाओ म्हणाले. 

यापूर्वीही उल्लेख -
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये चहा कामगारांच्या कल्याणासाठी १ हजार काेटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यावरून ईशान्येकडील खासदारांनी माेदींचे काैतुक केले. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी माेदींचा ‘भगवान शंकराचा अवतार’ म्हणून उल्लेख केला हाेता. 
 

Web Title: Prime Minister Narendra Maedi ‘Incarnation of God’; Praise of BJP MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.