पुन्हा ८ तारीख अन् रात्री ८ वाजताचा 'मुहूर्त'; पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:14 PM2019-08-08T15:14:35+5:302019-08-08T15:43:40+5:30
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशिष्ट दर्जा असलेले कलम 370 हटविले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी काय बोलणार याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा 8 चा योग जुळून आला आहे.
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशिष्ट दर्जा असलेले कलम 370 हटविले आहे. त्यानंतर, देशभरातून मोदी सरकारच्या धाडसी निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र, या निर्णयामुळे काश्मीरमधील वातावरण चिघळले असून सीमारेषेवर काहीसा तणाव निर्माण झाला आहे. तर पाकिस्तानही सैरभैर झाल्याचं दिसून येत आहे. भारताने घटनेतील कलम 370 आणि 35 ए हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतच संबंध तोडण्यास सुरुवात केली आहे. भारतासोबत असलेला व्यापार तोडण्यात आला आहे. तसेच, विमानसेवा बंद केली असून समझोता एक्सप्रेसही थांबविण्यात आली आहे. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युद्धाची तयारी दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार ? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि विधानसभेत कलम 370 आणि 35 ए हटविण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहांनी याबाबत संसदेत घोषणा केली होती. त्यानंतर, देशभरात काश्मीर मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, मोदींनी आजही देशाला संबोधित करण्यासाठी रात्री 8 वाजताची वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 8 चा योग जुळून आला आहे. कारण, नोटबंदी निर्णय जाहीर केला तेव्हाही, 8 तारीख आणि 8 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर, आज 8 तारीख असून रात्री 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
Prime Minister Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM today.
— PMO India (@PMOIndia) August 8, 2019