वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:54 PM2021-02-17T14:54:33+5:302021-02-17T14:56:21+5:30

तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस आणि सरकार यातील दरी कमी झाली आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. नास्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरम यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.

prime minister narendra modi address nasscom technology and leadership forum | वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला: पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next
ठळक मुद्देडिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला - पंतप्रधान मोदीतंत्रज्ञानामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता - पंतप्रधान मोदीकोरोना काळात बहुपयोगिता सिद्ध - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस आणि सरकार यातील दरी कमी झाली आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. नास्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरम यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. (prime minister narendra modi address nasscom technology and leadership forum)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना आयटी सेक्टरचे अनेकविध उपयोग सांगत कौतुक केले. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेकडो सरकारी सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

कामकाजात पारदर्शकता

तंत्रज्ञानामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता आली आहे. पायाभूत सुविधेशी निगडीत अनेक प्रकल्पांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चिन्हीत केले जात आहेत. तसेच यावर ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे. जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण केले जाऊ शकतील. तंत्रज्ञानामुळे मनुष्य दखल कमी केली जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले. 

कोरोना काळात सिद्ध

कोरोना संकटात विज्ञान आणि तंत्रज्ञानाता आपले सिद्धत्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. काही काळापूर्वीपर्यंत आपण लसींसाठी इतरांवर अवलंबून असायचो. मात्र, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारताने स्वतःची कोरोना लस तयार केली आणि अनेक देशांना आपण ती पाठवत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

लाखो रोजगाराच्या संधी

आयटी सेक्टरने ४ बिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या कालावधीत लाखों जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. भारताच्या विकासातील एक मजबूत खांब असल्याचे आयटी सेक्टरने दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Web Title: prime minister narendra modi address nasscom technology and leadership forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.