काँग्रेसकडून लोकशाही व्यवस्थेतील संस्थांचा अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:29 PM2018-12-19T21:29:10+5:302018-12-19T21:31:24+5:30
इव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - इव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सीएजीसारख्या संस्थांनाही टीकेमधून सोडलेले नाही. काँग्रेसचा डीएनए अजूनही तसाच आहे. ते जेव्हा जिंकतात तेव्हा इव्हीएम योग्य असल्याचे सांगतात. मात्र निकालांपूर्वी इव्हीएमबाबत संशय निर्माण करतात, असा टोला मोदींनी लगावला आहे.
तामिळनाडूमधील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीनी सांगितले की, काँग्रेस आणि त्याच्या या धोकादायक खेळाबाबत लोकांना माहिती दिली गेली पाहिजे. काँग्रेसने लष्कर, सीएजी आणि लोकशाही व्यवस्थेतील आवश्यक अशा संस्थांचा अवमान केला आहे.'' यावेळी काँग्रेसकडून इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या संशयावरही मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. '' काँग्रेसवाले इव्हीएमबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निकाल आपल्या बाजूने लागला की ते निकाल स्वीकारतात. ''
PM in interaction with BJP Karyakartas of Tamil Nadu & Puducherry: The perfect answer to undemocratic behavior of Congress is to strengthen democracy. Information&awareness are important for democracy. We should keep people informed about Congress & its dangerous games. pic.twitter.com/Pl6jC0VGyE
— ANI (@ANI) December 19, 2018
''हल्लीच काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण यांना न्यायालयाचा निर्णय मान्य झाला नव्हता. याआधी न्यायालयाला धमकावूनही यांना आपली मनामानी करता आली नव्हती. त्यांनी सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणण्याचा घाट घातला होता, असा आरोपही मोदींनी केला.
PM in interaction with BJP Karyakartas of Tamil Nadu&Puducherry: Before every election they begin to make noise about EVMs, trying to create an atmosphere of doubt. However after elections, if Congress performs well they seem to accept results that have come out of the same EVM. pic.twitter.com/QH1Abm8WLj
— ANI (@ANI) December 19, 2018