'भारत माता की जय' घोषणेने 'दीदी' होतात नाराज; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By देवेश फडके | Published: February 7, 2021 06:23 PM2021-02-07T18:23:25+5:302021-02-07T18:25:08+5:30

पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

prime minister narendra modi attacks on mamata banerjee in haldia west bengal | 'भारत माता की जय' घोषणेने 'दीदी' होतात नाराज; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

'भारत माता की जय' घोषणेने 'दीदी' होतात नाराज; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जी सरकारवर निशाणाविकासाची गती कायम राखण्यात बंगाल अपयशी - पंतप्रधानतृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींनी डागली तोफ

कोलकाता :पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे काही प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (prime minister narendra modi attacks on mamata banerjee in haldia west bengal)

हल्दिया येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासह संपूर्ण देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या बंगालच्या भूमिला साष्टांग नमस्कार करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त बंगालमध्ये आलो होतो. आता पश्चिम बंगालच्या विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

भारत माता की जय घोषणेचा ममता दीदींना राग

सरकारकडे आपले अधिकार, हक्क यांची मागणी केली की, ममता दीदी नाराज होतात. भारत माता की जय या घोषणेचाही ममता दीदींना राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. कोलकाता येथे साडे आठ हजार कोटी अपेक्षित खर्च असणारा प्रकल्प सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आमचा चहा बदनाम करण्यासाठी परदेशात कट; टुलकिट खुलाशावर पंतप्रधानांचा हल्लाबोल

विकासाची गती राखण्यात बंगाल मागे

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक पटीने पुढे होते. बंगालमध्ये पायाभूत सुविधा उत्तम होत्या. नोकऱ्यांच्या अनेकविध संधी होत्या. भारतासह संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या बंगालला आजही मोठा सन्मान प्राप्त होतो. असे सर्व असताना विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. 

विकासाचे राजकारण नाही

पश्चिम बंगालमधील आजच्या स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथे विकासाचे राजकारण झाले नाही. काँग्रेस कार्यकाळात येथे भ्रष्टाचार होता. डाव्या पक्षांच्या काळातही भ्रष्टाचार फोफावला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, गेल्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही, हेच आजच्या घडीला स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Web Title: prime minister narendra modi attacks on mamata banerjee in haldia west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.