मोदींची 'आयपीएल डिप्लोमसी'; नेपाळ दौऱ्यात जोरदार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 07:03 PM2018-05-12T19:03:16+5:302018-05-12T19:03:16+5:30

क्रिकेटमुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होत असल्याचं मोदी म्हणाले

Prime Minister Narendra Modi bats for cricket for boosting India Nepal partnership | मोदींची 'आयपीएल डिप्लोमसी'; नेपाळ दौऱ्यात जोरदार बॅटिंग

मोदींची 'आयपीएल डिप्लोमसी'; नेपाळ दौऱ्यात जोरदार बॅटिंग

googlenewsNext

काठमांडू: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात क्रिकेट संदर्भ देत संवाद साधला.  त्यांनी काठमांडूमध्ये लोकांना संबोधित करताना क्रिकेटच्या माध्यमातून नातं जोडण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमुळे नेपाळ आणि भारत एकमेकांशी जोडले गेल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. दोन देशांमधील संबंध यापुढे आणखी मजबूत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी नेपाळमध्ये बॅटिंग केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यात क्रिकेटचा उल्लेख केला. 'आता आपण क्रिकेटच्या माध्यमातूनही जोडले गेलो आहोत. नेपाळचा मुलगा आयपीएलमध्ये खेळतो आहे,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी मोदींनी संदीप लामिचाने यांचा उल्लेख केला. संदीप लाचिमाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. जानेवारी महिन्यात आयपीएलसाठी लिलाव झाला होता. दिल्ली डेअरडेविल्सनं संदीपला संघात घेतलं होतं.  

सतरा वर्षांच्या संदीप लामिचाने या फिरकीपटूनं दोन वर्षांपूर्वी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. संदीपच्या शानदार कामगिरीमुळे नेपाळनं आठवं स्थान मिळवलं होतं. दिल्ली डेअरडेविल्सच्या संघानं संदीपसाठी 20 लाख रुपयांची बोली लावली होती. 
 

Web Title: Prime Minister Narendra Modi bats for cricket for boosting India Nepal partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.