आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 05:40 PM2023-09-17T17:40:12+5:302023-09-17T17:42:05+5:30

पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का?

Prime Minister narendra modi birthday know about his salary and net worth | आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी?

आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी?

googlenewsNext

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. 1950 मध्ये जन्मलेले पीएम मोदी आता 73 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपकडून संपूर्ण देशभरात आज विविध कामांचे आयोजन करण्यात आले आहे. पण, पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का? 

भारताच्या पंतप्रधानाला किती मिळते वेतन? -
भारताच्या पंतप्रधानाच्या वेतनासंदर्भात बोलायचे झाल्यास, सध्या भारताच्या पंतप्रधानाला 19 ते 20 लाख रुपये एवढे वार्षिक वेतन मिळते. तर मासिक वेतनासंदर्भात बोलायचे  झाल्यास, त्यांना जवळपास 1.60 लाख ते 2 लाख रुपये एवढे मासिक वेतन मिळते. यात बेसिक पे, दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतरही काही भत्त्यांचा समावेश असतो.

पंतप्रधान मोदींची संपत्ती -
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटवरील मार्च 2022 पर्यंतच्या उत्पन्न आणि मालमत्तेच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींकडे, 2.23 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. ज्यामध्ये बहुतांश रक्कम ही बँक ठेवींच्या स्वरुपात आहे. पीएमओच्या खुलाशानुसार, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गांधीनगरमधील जमीन दान केल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 2014 पासून देशाचे अर्थात भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी 2001 ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्त आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारकही राहिले आहे.

Web Title: Prime Minister narendra modi birthday know about his salary and net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.