इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध केला, चर्चेसाठी आवाहन केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:19 PM2023-11-17T12:19:32+5:302023-11-17T12:20:19+5:30
आज दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल शिखर संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायल- हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल- हमासमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धात अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरीकांच्या मृत्यूवर निषेध व्यक्त केला आहे. आज दुसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल शिखर संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त केला.
दुसऱ्या वॉयस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हिंसा आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या अटूट भूमिकेवर भर दिला. या दहशतवादी घटनेत इस्रायलने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याचाही समावेश आहे. युद्ध संपवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संयम राखण्याचे आणि संवादाला प्राधान्य देण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, केला IED स्फोट
पीएम मोदी म्हणाले, पश्चिम आशिया प्रदेशात घडणाऱ्या घटनांमुळे नवीन आव्हाने उभी राहत आहेत. भारताने ७ ऑक्टोंबर रोजी इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. आम्ही संयम ठेवला आहे. आम्ही संवाद आणि मुत्सदेगीरीवर भर दिला आहे. आम्ही इस्त्रायल- हमास युद्धात सामान्य नागरिकांचा मृत्यूचा निषेध करत आहोत, असंही मोदी म्हणाले.
आम्ही पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधल्यानंतर पॅलेस्टिनी लोकांना मदत पाठवली आहे. हीच वेळ आहे ग्लोबल साऊथच्या लोकांनी एकत्र यायला हवे, असंही पीएम मोदी म्हणाले.
ग्लोबल साउथ हा मुख्यतः आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात स्थित देशांचा समूह आहे, येथे आर्थिक विकास बदलतो. या देशांची वैशिष्टय़े सारखी नसली तरी गरिबी, विषमता आणि संसाधनांपर्यंत मर्यादित प्रवेश यासारखी आव्हाने या देशांमध्ये समान आहेत.
पॅलेस्टिनी संघटना हमासने गेल्या महिन्यात ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर जमीन-समुद्री-हवाई हल्ले सुरू केल्यापासून १,२०० हून अधिक इस्रायली, बहुतेक नागरिक ठार झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या गडावर हवाई हल्ले केले आणि ११,००० हून अधिक लोक मारले आहेत.