वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, कंठ दाटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:42 PM2021-05-21T15:42:00+5:302021-05-21T15:59:44+5:30

वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

Prime Minister Narendra Modi is emotional while talking to doctors in Varanasi | वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, कंठ दाटला

वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, कंठ दाटला

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो.

मुंबई - कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा करत आहेत. मोदींनी आज वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असेही मोदींनी म्हटले. 

योगींची संसदेतील आठवण 

पूर्वांचल प्रदेशात अगोदर लहान मुलांमध्ये मेंदूंच्या आजारामुळे विदारक परिस्थिती होती. त्यामुळे, दरवर्षी हजारो मुले मृत्यूमुखी पडत होती. योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्युंमुळे ते संसदेत धाय मोकलून रडले होते. या लहान मुलांना वाचविण्याची विनंतीपूर्ण मागणी ते करत होते. मात्र, योगी आदित्यनाथ जेव्हा मुख्यमंत्री बनले, तेव्हा केंद्र सरकारसोबत एकत्र येऊन त्यांनी मेंदूंच्या आजारासाठी उपायांचं अभियान राबवलं. सद्यस्थिती कित्येक लहानग्यांना वाचविण्यात आपल्याला यश आलंय, असे मोदींनी म्हटले. 

ब्लॅक फंगसचा सामना करूया

जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.   

आरोग्य व्यवस्थेवर ताण

कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत लढताना अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. यावेळी संक्रमणाचा वेग पहिल्यापेक्षा अधिक आहे. तसेच, रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलाय, असेही मोदींनी म्हटलं.

Read in English

Web Title: Prime Minister Narendra Modi is emotional while talking to doctors in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.