Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:16 PM2020-08-10T12:16:00+5:302021-01-27T14:28:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र पाठविले आहे. यावर पीआयबीने खुलासा केला आहे.

Prime Minister Narendra Modi gave Rs 50 crore for Ram Mandir; see the viral truth | Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Next

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. या पत्रामध्ये मोदींनी योगींना आणि त्यांच्या टीमचे हिंदू राष्ट्रासाठी त्यांच्या योगदानाबाबत अभिनंदन केले आहे. तसेच राम मंदिरासाठी ते लवकरच 50 कोटी रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. 


या पत्राबाबत PIB Fact Check ने ट्विटरवर माहिती दिली असून हे पत्र खोटे असल्याचे म्हटले आहे. हे व्हायरल पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या नावे पंतप्रधान कार्यालयाद्वारे जारी करण्यात आले आहे. यामध्ये मोदी म्हणतात की, मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हिंदू राष्ट्रासाठी तुमच्या बहुमुल्य योगदानासाठी अभिनंदन करत आहे. राम मंदिर निर्माणामध्ये हा मैलाचा दगड पार करण्य़ासाठी इमानदारी आणि कष्ट घेतल्याने हिंदी नेहमीच तुमचे आभारी राहतील. हा एक हिंदू राष्ट्रासाठी नवीन इतिहास ठरणार आहे. 



पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या 2022 च्या निवडणुकांसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मी पंतप्रधान कार्यालयाकडून राम मंदिराच्या बांधकामासाठी 50 कोटी रुपये पाठवत आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी, ५ आॅगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात करण्यात आले होते. एशियन न्यूज इंटरनॅशनल आणि असोसिएटस प्रेस टेलिव्हिजन न्यूजच्या माध्यमातून जगभरात या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरदर्शनच्या डीडी न्यूजने स्वतंत्रपणे या सोहळ्याची दृश्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी प्रसारित केले.


मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही
मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही, हा सौहार्दपूर्ण संदेश देण्यासाठी मी राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला गेलो होतो, असे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले. अयोध्या खटल्यातील पक्षकार दिवंगत हाशीम अन्सारी यांचे इक्बाल अन्सारी पुत्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. हिंदू बांधव आमच्यासोबत आहेत आणि आम्ही या आनंदाच्या क्षणी त्यांच्यासोबत आहोत, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

Web Title: Prime Minister Narendra Modi gave Rs 50 crore for Ram Mandir; see the viral truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.