पंतप्रधान मोदींची अंदमान-निकोबारला मोठी गिफ्ट, 3 द्वीपांचं केलं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 07:33 PM2018-12-30T19:33:17+5:302018-12-30T19:53:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत.
पोर्ट ब्लेअर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत. अंदमान-निकोबारमध्ये पोहोचल्यानंतर मोदींनी 2004च्या सुनामीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी अंदमान-निकोबारमधली जेलही पाहिली. त्यानंतर मोदींनी पोर्ट ब्लेअरमध्ये एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. तसेच अंदमान-निकोबारला डीम्ड युनिव्हर्सिटीचं गिफ्ट दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं आहे. नील द्वीप आता शहीद द्वीप म्हणून ओळखलं जाणार आहे. तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण येते, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव गौरव आणि सन्मानानं घेतलं जातं. आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान सुभाष बाबूंनी अंदमानच्या धरतीवरून भारताच्या स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं. आझाद हिंद सेनेनं इथे तिरंगा फडकावला. मोदी म्हणाले, 30 डिसेंबर 1943च्या त्या ऐतिहासिक घटनेला आज 75 वर्षं पूर्ण झाली आहे. यावेळी मोदींनी 150 फूट उंच झेंड्याचं ध्वजारोहण केलं.
PM Modi at Marina Park in Port Blair, Andaman & Nicobar Islands: INA hoisted a tricolor here on 30 Dec 1943, 75 years have passed since that historic day. In memory of that event we're hoisting a 150 feet tall flag to etch this event in memory of our citizens for a long time. pic.twitter.com/YSRHwtS3z2
— ANI (@ANI) December 30, 2018
ब्रिटिशांच्या गुलामीत असतानाही भारतातील एकता कायम होती. प्राचीन काळापासून भारतवासीय एकत्र असल्याचंही सुभाष बाबू बोलायचे, गुलामीच्या दरम्यान ही एकता भंग करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु ते त्यांना शक्य झालं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देशाला एकसंध केल्यास लोकांची मानसिकता बदलेल.
PM Narendra Modi at Marina Park in Port Blair, Andaman and Nicobar Islands: From today, the three islands in Andaman and Nicobar- Ross Island will be known with the name of Netaji Subhas Chandra Bose Island, Neil Island as Shaheed Dweep & Havelock Island as Swaraj Dweep pic.twitter.com/9mAB0UvZRk
— ANI (@ANI) December 30, 2018
नेताजींच्या पावलावर पाऊल ठेवत आज 130 कोटी भारतीय एक भारत, श्रेष्ठ भारत बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याचा मला आनंद असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. इतिहास हा पुरुषार्थ, शौर्य आणि वेदनेचा परिपाक आहे. इतिहासातूनही पुरुषार्थाला पराक्रमाची प्रेरणा मिळते. इतिहास आपल्या परिश्रमाचं प्रतिबिंब आहे. इतिहास आपल्याला सतर्क करतो, तसेच इतिहास आपल्याला सावधानता बाळगण्यासही शिकवतो.
PM Modi at Marina Park in Port Blair, Andaman & Nicobar Islands: Foundation stones have been laid for important projects here to fulfil the demand of water&electricity. The height of Danikari Dam is being increased so that there is no problem of water here for the next 20 years. pic.twitter.com/M88Icsd4r1
— ANI (@ANI) December 30, 2018
इथल्या पाणी आणि विजेची समस्या सोडवण्यासाठीच आम्ही निरनिराळे प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. येत्या 20 वर्षांत पाण्याची समस्या कायमची सुटावी यासाठी धानिकारी धरणांची उंची वाढवली जात आहे. तसेच 6 महिन्यात इथे 7 मेगावॉट सोलर पावर प्लांट्सला मंजुरी दिली आहे, असंही मोदी म्हणाले आहे. तसेच लहानगे, तरुण, वृद्ध आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.
WATCH: Prime Minister Narendra Modi while addressing a public meeting at Marina Park in Port Blair, Andaman and Nicobar Islands asks people to take out their mobile phones and switch on the flashlights as a gesture to pay tribute to Netaji Subhas Chandra Bose. pic.twitter.com/aoQFwfZrK0
— ANI (@ANI) December 30, 2018