आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:55 PM2019-04-24T17:55:51+5:302019-04-24T17:56:20+5:30

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

Prime Minister Narendra Modi give answer Why he not stay with mother? | आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

Next

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आई त्यांच्या सोबत का राहत नाही, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचेही उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले. 

दिल्लीतील पंतप्रधान आवासमधील या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही राहता. मग तुमची आई-भाऊ सोबत राहावेत, असे तुम्हाला वाटत नाही का, अशी विचारणा केली असता मोदी म्हणाले की, ''जर मी पंतप्रधान बनून घरातून बाहेर पडलो असतो तर कुटुंबीयांना सोबत आणावे असे, वाटले असते. मात्र मी खूप लहान वयात घर सोडले. त्यानंतर जीवनात बदल झाला. तसेच माझे प्रशिक्षणही त्याच पद्धतीने झाले आहे. ज्यावेळी घर सोडले तेव्हा खूप त्रास झाला होता. मात्र आता सवय झावी आहे. मनाला वाटलं तेव्हा आईला बोलावून घेतले. तिच्यासोबत काही दिवस व्यतित केले. आता जेव्हा जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती सव्वा रुपया माझ्या हातावर ठेवते. मग सांगते की माझ्यामागे वेळ वाया का घालवत आहेस. मी इथे राहून काय करू. गावात लोक येत जात असतात. गप्पागोष्टी होतात. तसेच मी सुद्धा तीला फार वेळ देऊ शकत नाही.''  

यावेळी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.  

Web Title: Prime Minister Narendra Modi give answer Why he not stay with mother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.