पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्कार प्रदान, UN मध्ये भारताचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 01:08 PM2018-10-03T13:08:15+5:302018-10-03T13:19:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मँक्रो यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान दिला जातो. Prime Minister Narendra Modi receives the 'UNEP Champions of the Earth' award from United Nations Secretary General Antonio Guterres, at a ceremony in Delhi. pic.twitter.com/Z87AuxiUUs
पर्यावरण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलल्यामुळेच मोदींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रानं या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तिथे उपस्थित होत्या. केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. सस्टेनेबल एनर्जी (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रातील गतिमानतेसाठी दूरदृष्टी दाखविल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरऊर्जेवर कार्यरत असणारे देशातील पहिले विमानतळ आहे.