पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौभाग्य योजनेचं केलं अनावरण, आता गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 07:50 PM2017-09-25T19:50:47+5:302017-09-25T20:35:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं.
नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार असून, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू आहे. एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय आहे. देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले आहेत. आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
#Watch PM Narendra Modi speaking at the inauguration of ONGC's Deendayal Urja Bhawan. https://t.co/RJMyGBB3Wu
— ANI (@ANI) September 25, 2017
2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले. सौभाग्य योजनेचा देशातील अडीच कोटी लोकांना फायदा होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
देशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात
देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले
काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती
आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त
देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले
प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देणार, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन देणार
2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही
हर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज देणार
गरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार
स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही
सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू
गरिबांचं कल्याण ही सरकारची ओळख
एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार
9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय
देशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात