पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 05:11 PM2023-04-23T17:11:29+5:302023-04-23T17:14:08+5:30

ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे. 

Prime Minister Narendra Modi hear our call; sakshi malik, punia, phogat Serious allegations of wrestlers against BJP MP Brijbhushan singh, Police, Ministry | पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

googlenewsNext

कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात आज पुन्हा पुरुष तसेच महिला पैलवानांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवर जंतर मंतरवरच राहणार असल्याची घोषणा या पैलवानांनी केली आहे. ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे. 

तिघांनीही आज पत्रकार परिषद घेतली, यामध्ये त्यांनी पोलीस आणि मंत्रालयावरही गंभीर आरोप केले आहेत. सात महिला पैलवानांनी तक्रार दिलेली आहे. परंतू पोलिसांनी अद्याप यावर एफआयआर दाखल केलेला नाहीय. पोलीस अधिकारी सोमवारी बोलू असे सांगत आहेत, परंतू ते यात विलंब करत आहेत. हे प्रकरण एवढे नाजूक आहे की यात एवढा वेळ का लावला जात आहे हे समजत नाहीय, असा आरोप साक्षी हिने केला आहे. 

अडीज महिन्यांपूर्वीच्या आरोपांवर चौकशी समिती बसविण्यात आली. परंतू या समितीने काय तपास केला आणि काय निष्कर्ष काढला हे समोर आलेले नाही. पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरणर आहे. हॅरॅसमेंटचे प्रकरण किती घातक असते, आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून हे झेलत आहोत. आम्हीच सुरक्षित नसू तर कोण सुरक्षित असेल. मंत्रालय आणि कमिटीकडून आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून उत्तर मागत आहोत. मात्र ते वेळही देत नाहीएत, असा आरोप साक्षीने केला आहे. 


ब्रृजभूषण सिंहांना वाचविण्यासाठी कोण कोण लोक त्याची साथ देत आहेत आम्हाला माहिती नाहीय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही, असे पुनियाने म्हटले. यादरम्यान विनेश फोगाट भावूक होऊन रडू लागली होती. आम्हाला तेव्हाही विश्वास होता, आताही आहे की आम्हाला न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमची हाक आहे की आमचे ऐकावे, कुस्ती सुरक्षित हातांमध्ये जावी असे आम्हाला वाटत आहे. आमच्या तक्रारीवर कारवाई केली जात नाहीय. आता या लोकांनी आम्ही संपल्याचे सांगायला सुरुवात केली आहे, आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन साक्षी हिने केले आहे. 

आम्ही जंतर मंतरवरच मरू, अवघ्या देशाने पाहूदे तरी. बृजभूषण यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी फोगाटने केली आहे. 
 

Web Title: Prime Minister Narendra Modi hear our call; sakshi malik, punia, phogat Serious allegations of wrestlers against BJP MP Brijbhushan singh, Police, Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.