पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 200 सीईओंशी संवाद साधला, त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 06:30 PM2017-08-22T18:30:55+5:302017-08-22T19:52:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे
नवी दिल्ली, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे
- सरकार चालवताना लोकांचे कल्याण आणि नागरीकांच्या आनंदाला सर्वोच्च प्राथमिकता आहे.
- प्रत्येक नागरीकाला देश आपला आहे असे वाटले पाहिजे, मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. देशाच्या विकासात मला काहीतरी योगदान द्यायचे आहे असे प्रत्येक नागरीकाला वाटले पाहिजे.
- प्रत्येक भारतीयाला भारत स्वतंत्र व्हावा असे वाटत होते, पण गांधीजींनी स्वातंत्र्य लढयात वेगळेपणा निर्माण केला. आपण देशांसाठी काम करतोय अशी भावना त्यांनी प्रत्येकामध्ये निर्माण केली. त्यांनी स्वातंत्र्याची लढाई एका मोठया चळवळीमध्ये बदलली. त्यानंतर काय घडले ते आपल्या सर्वांना माहिती आहे.
- जे गांधीजींनी स्वातंत्र्य लढयाच्या बाबतीत केले तसेच आपल्याला भारताच्या विकासाला मोठया चळवळीमध्ये बदलले पाहिजे.
- आपण एकत्र मिळून काम करु तेव्हा देशासमोरच्या अनेक समस्या सोडवू शकतो.
- इंडस्ट्री लीडर या नात्याने तुम्ही समाजातल्या गरीबातल्या गरीबासाठी काय करु शकता याचा विचार करा.
- निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या योगदानाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
वाजपेयी, मनमोहन सिंगांपेक्षा मोदींच्या काळात वेगाने झाल्या आर्थिक सुधारणा
तीन वर्षापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिल्याचे अमेरिकेतील प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासक चेअर रिचर्ड एम रोसोने यांनी सांगितले आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनाही मागे टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रपधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 37 क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात 29 क्षेत्रात सुधारणा झाली होती. तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात 19 तर दुसऱ्या कार्यकाळात 18 क्षेत्रात सुधारणा झाली आहे. बाह्य घटक आणि भारतातील विदेशी गुंतवणूक चालना मिळाली आहे. परकीय गुंतवणुकीला सरकारने केलेल्या सुधारणा आणि खुले केलेले धोरण, यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळून यात वाढ झाली आहे.
In the same spirit as what Mahatma Gandhi did for the freedom struggle, we need to make India's development a mass movement: PM Modi pic.twitter.com/p6n3Va37JS
— ANI (@ANI) August 22, 2017