इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार; देशातील पहिला सीएनजी टर्मिनल, मेट्रो, वंदे भारत...आणखी काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:46 PM2022-09-28T13:46:43+5:302022-09-28T13:48:37+5:30
गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.
नवी दिल्ली :गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात मोदी गुजरातला २९ हजार कोटींचे गिफ्ट देणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील तिसऱ्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. यासह अमदाबाद मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच सुरत, भावनगर या शहरात १० हजार कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ करणार आहेत.
केवळ PFIवर बंदी कशाला? आता संघावरही बंदी घाला, काँग्रेस नेत्यांनी केली अशी मागणी
सध्या देशभरात नवरात्री उत्साहात सुरू आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. पीएम मोदी भावनगरमध्ये जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलची पायाभरणीही करणार आहेत.
गांधीनगर-मुंबई तिसरी वंदे भारत रेल्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गांधीनगर-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ते स्वत: या रेल्वेतून कालुपूरपर्यंत प्रवास करणार आहेत. देशात सध्या २ वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या आहेत. आता तिसरी गांधीनगर ते मुंबई अशी रेल्वेसेवा सुरू होणार आहे. तसेच ते अहमदाबाद मेट्रोचेही उद्घाटन करणार आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलटांची लॉबिंग सुरू, आमदारांशी संपर्क वाढवला...
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांच्या तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने आता गुजरातमध्येही पाऊल ठेवले आहे. तर काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपनेही गुजरातकडे लक्ष केंद्रीत केले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.