पंतप्रधान नरेंद्र मोदी एमए फर्स्ट क्लासने उर्तीण
By admin | Published: May 1, 2016 09:32 AM2016-05-01T09:32:47+5:302016-05-01T10:27:44+5:30
देशातील अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक माहितीची उत्सुक्ता लागून राहिली होती. ही माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. १ - देशातील अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक माहितीची उत्सुक्ता लागून राहिली होती. ही माहिती समोर आली आहे. गुजरात विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी पॉलिटिकल सायन्समधून एमए केले. एमए फर्स्ट क्लासने ते उर्तीण झाले होते.
अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे. मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती आयुक्त श्रीधर आचार्ययुलू यांच्याकडे मोदींची शैक्षणिक माहिती उघड करण्याची विनंती केली होती. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून मोदींच्या शैक्षणिक कामगिरीची माहितीही केजरीवालांनी मागितली होती.
केंद्रीय माहिती आयागाने शुक्रवारी दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. महत्वाची माहिती जाणून घेण्यात माहिती आयोग अडथळे आणत असल्याची केजरीवालांनी टीका केल्यानंतर माहिती आयोगाने हे निर्देश दिले.
गुजरात विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार मोदींनी १९८३ साली पॉलिटिकल सायन्समधून एमए करताना ६२.३ टक्के गुण मिळवले. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांना युरोपियन पॉलिटिक्स, भारतीय राजकारण विश्लेषण, राजकारणाचे मानसशास्त्र हे विषय होते. पंतप्रधानांनी ग्रॅज्युएशन कुठून केले त्याची विद्यापीठाकडे कोणतीही माहिती नाही.
मोदींनी विसनगरच्या एमएस सायन्स कॉलेजमधून प्रीसायन्सचे शिक्षण पूर्ण केले. योगायोग म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही याच कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या. दोघांचाही रोलनंबर सारखाच ७१ होता. माहिती अधिकारातंर्गत मोदींच्या शैक्षणिक पदवीची माहिती मागणारे अर्ज गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाने सातत्याने फेटाळून लावले होते.
मोदींच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार त्यांनी १९७८ साली दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु एम एन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच्या पहिल्या वर्षाला मोदींना ४०० पैकी २३७ गुण मिळाले आणि दुस-या वर्षाला २६२ गुण मिळाले. त्यांना ८०० पैकी एकूण ४९९ गुण मिळाले.