पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर रवाना
By admin | Published: November 10, 2016 12:52 PM2016-11-10T12:52:08+5:302016-11-10T12:52:08+5:30
जपानची राजधानी टोक्योमध्ये होणा-या वार्षिक व्दिपक्षीय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर रवाना झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
टोक्यो, दि. १० - जपानची राजधानी टोक्योमध्ये होणा-या वार्षिक व्दिपक्षीय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर रवाना झाले आहेत. दोन्ही देशांमधील हायस्पीड रेल्वे सहकार्यामुळे व्दिपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीला अधिक बळ मिळेल असे पंतप्रधान मोदींनी जपनाला रवाना होण्यापूर्वी सांगितले.
भारतात हायस्पीड रेल नेटवर्क उभारण्यासाठी भारत आणि जपानमध्ये झालेला करार दृढ संबंधाचे एक उदहारण आहे असे मोदींनी सांगितले. यामुळे फक्त व्यापार आणि गुंतवणूकीलाच चालना मिळणार नाही तर, भारतात कौशल्य आधारीत नोक-यांची निर्मिती वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा होईल आणि मेक इन इंडिया मोहिमेला चालना मिळेल असे मोदींनी सांगितले.
मागच्यावर्षी जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे भारत दौ-यावर आले होते. १२ नोव्हेंबरला मी आणि अॅबे शिंकासेन या हायस्पीड रेल्वे नेटवर्कने कोबे येथे एकत्र प्रवास करणार आहोत. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असे मोदींनी सांगितले.