दक्षिण आशियाई देशांशी साधणार सकारात्मक संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:56 AM2020-08-16T02:56:11+5:302020-08-16T06:38:06+5:30

ईशान्य लद्दाख खोऱ्यात चीनची दादागिरी सहन न करण्याचा मोठा संदेश मोदींनी दिला व त्याचेच प्रतिबिंब आजच्या भाषणात उमटले.

prime minister narendra modi Positive dialogue with South Asian countries | दक्षिण आशियाई देशांशी साधणार सकारात्मक संवाद

दक्षिण आशियाई देशांशी साधणार सकारात्मक संवाद

Next

नवी दिल्ली: पहिल्यांदा सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय धोरण पाश्चिमात्यांऐवजी पूर्वेकडील देशांना (लूक ईस्ट) महत्त्व देण्याचे
ठरवले होते. ७४ व्या स्वातंत्र्यदिनी मात्र चीन व पाकिस्तानचा धोका ओळखून मोदींनी आता दक्षिण आशियाई देशांशी संबंध मजबूत करणार असल्याचे संकेत दिले.
ईशान्य लद्दाख खोऱ्यात चीनची दादागिरी सहन न करण्याचा मोठा संदेश मोदींनी दिला व त्याचेच प्रतिबिंब आजच्या भाषणात उमटले. लेह दौ-यादरम्यान मोदींनी विस्तारवादी ठरवून अप्रत्यक्षपणे चीनला सुनावले होते. आताही चीनचे नाव न घेता लद्दाखमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेले शौर्य जगाने पाहिले, असे म्हणून मोदींनी ड्रॅगनला डिवचले. गेल्या तीन महिन्यांपासून ईशान्य लद्दाखमध्ये चीनी सैनिक स्वहद्दीत पुढे आले आहे. त्यास भारताने आक्षेप घेतला आहे. गलवान खोºयातील हिंसक झटापटीनंतर भारताने पहिल्यांदाच चीनविरोधात तीव्र सूर प्रकट केला आहे.
आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व राजनैतिक स्तरावरही चीनची कोंडी भाराने केली आहे. पहिल्यांदाच चीन, पाकिस्तान व नेपाळसमवेत एकाच वेळी भारताचा तणाव वाढला आहे. नेपाळविषयी मात्र मोदींनी कोणतीही टीप्पणी आजच्या भाषणात केली नाही. ते म्हणाले, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असो किंवा नियंत्रण रेषा देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सैन्याने त्याच भाषेत उत्तर दिले आहे. दहशतवाद असो अथवा विस्तारवाद भारत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे.
राजनैतिक भान राखून मोदी यांनी शेजारी देशांसमेत सुरक्षा, विकास व विश्वास कायम ठेवून भारताने सहकार्य केले असल्याचेही म्हटले. दक्षिण आशियाई देशांमध्ये जगातील एक चतुर्थांश लोक राहतात. सहयोग व समावेशी सहकार्याने या भागात विकास व समृद्धी येईल. या भागातील देशांच्या लोकप्रतिनिधींवर प्रगतीपथावर आपापल्या देशाला नेण्याची जबाबदारी असल्याचे मोदींनी नमूद केले. केवळ शेजारी नव्हे, केवळ सीमा भूभाग नव्हे तर या देशांशी आम्ही मनानेही एकरूप आहोत, अशी साद मोदींनी दक्षिण आशियाई देशांना घातली.
भूतान, अफगाणस्तिान, मालिदव, श्रीलंका, बांगलादेश या देशांशी सकारात्मक संवाद साधण्यावर भारताचा भर आहे. नेपाळ व पाकिस्तान मोठ्या
आर्थिक गुंतवणुकीमुळे चीनच्या दबावाखाली असल्यानेच पंतप्रधान
मोदींनी दक्षिण आशियातील उरलेल्या देशांशी संबध सुधारण्यावर भर दिला
आहे.
>नेपाळच्या पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा
काठमांडू : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्य देशांमध्ये भारताची निवड झाल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. सीमावाद आणि चीनसोबतच्या जवळीकमुळे भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. मात्र अशा परिस्थितीत ओली यांनी फोन करणे महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोरोनामुळे दोन्ही देशात कोरोनामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
>ग्रामपंचायतींची
डिजिटल वाटचाल
कोरोनाकाळात ‘डिजिटल भारत’ योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. मागील महिनाभरात तब्बल ३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले. त्यामुळे गावागावात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगत पंतप्रधानांनी राम मंदिर विषयावरही भाष्य केले.
शतकांहून जुन्या विषयाचे शांततेत निराकरण झाले. देशातील शांती, एकता आणि सद्भावना भारताच्या उज्ज्वल भविष्याची खात्री असल्याचे ते म्हणाले.
नुकतेच घोषित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास जागवत पंतप्रधान मोदी यांनी सरकारने अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
२0१४ पूर्वी देशात केवळ साठ ग्रामपंचायती आॅप्टिकल
फायबरशी जोडल्या गेल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत दीड लाखाहून
अधिक ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरशी जोडण्यात आल्या आहेत. येत्या एक हजार दिवसांत देशातील प्रत्येक गावाला आॅप्टिकल फायबरशी जोडण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात केली.

Web Title: prime minister narendra modi Positive dialogue with South Asian countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.