वाघांची घटती संख्या चिंताजनक- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 10:21 AM2019-07-29T10:21:13+5:302019-07-29T11:00:42+5:30

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तानं मोदींनी आज जनतेला संबोधित केलं आहे.

Prime Minister Narendra Modi releases All India Tiger Estimation 2018 | वाघांची घटती संख्या चिंताजनक- नरेंद्र मोदी

वाघांची घटती संख्या चिंताजनक- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तानं मोदींनी आज जनतेला संबोधित केलं आहे. जगात वाघांची घटती संख्या चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले आहे. सद्यस्थितीत भारतात फक्त 3 हजार वाघ आहेत. मोदींनी अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2018 जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, 2014च्या तुलनेत वाघांची संख्या 741नं वाढली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या माहितीनुसार, 2014च्या शेवटी झालेल्या जनगणनेनुसार भारतात 2226 वाघ होते, जे 2010च्या तुलनेत जास्त आहेत. देशभरात सध्या 2 हजार 967 वाघ आहेत.  

2010मध्ये वाघांची संख्या 1706 होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाघांच्या संख्येसंदर्भात रिपोर्ट जारी करत म्हणाले, आजही आम्ही वाघांची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतात वाघांची वाढत असलेल्या संख्येनं प्रत्येक देशवासीय नक्कीच खूश होईल. 9 वर्षांपूर्वी सेंट पीटर्सबर्गमध्ये 2022पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपण हे लक्ष्य 4 वर्षांतच पूर्ण केलं आहे. जगभरात वाघांची संख्या घटत असल्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. 

Web Title: Prime Minister Narendra Modi releases All India Tiger Estimation 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.