Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले जम्मू काश्मीरला केंद्रशासित करण्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:35 PM2019-08-08T20:35:05+5:302019-08-08T20:42:38+5:30
आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित घोषित करण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीजम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले.
आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. काही काळापूर्वी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जम्मू काश्मीरसाठी आखलेल्या कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. प्रशासनामध्ये गतिशिलता आली आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. विशेषकरून रस्तेबांधणी, रेल्वेसारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत.''
PM: The decision to keep J&K directly under Central administration for a brief period was a well thought over decision. Since Governor rule was implemented in J&K, state admin has been directly in touch with Centre due to which the effects of good governance can be seen on ground pic.twitter.com/VeTR3shZMH
— ANI (@ANI) August 8, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे.
यावेळी मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर, लडाखवासियांचे अभिनंदनही केले. तसेच रिक्त पोलिस, सरकारी पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत. तसेच सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी योजनांपासून लांब राहावे लागले होते. मात्र, आम्ही लवकरात लवकर याचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना फायदा मिळवून देणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.