चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:02 PM2024-02-20T15:02:39+5:302024-02-20T15:03:33+5:30

pm narendra modi stopped speech seeing child raised in air by person jammuPM Modi Jammu:  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले...

Prime Minister Narendra Modi stopped his speech in Jammu after seeing the child lifted up, what did he say? | चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करताना मधेच थांबले. सरकार गरीब, शेतकरी, युवा शक्ती आणि नारी शक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असे मोदी म्हणत असतानाच त्यांची नजर समोरील गर्दीमधील एका पिवळे कपडे परिधान केलेल्या बाळावर पडली. या चिमुकलीला तिच्या पालकांनी वर उचलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले, 'त्या चिमुकलीला त्रास नका देऊ.'

पंतप्रधान मोदी म्हणाले, ती फार छोटी आहे. हाताने इशारा करत मोदी म्हणाले, जर ती येथे असती (व्यासपीठावर) तर मी तिला भरपूर आशीर्वाद दिले असते. मात्र या थंडीत त्या चिमुकलीला त्रास नका देऊ. पंतप्रधान काही वेळ स्मित करत होते. यानंतर लोक घोषणा देऊ लागले.

आर्टिकल 370 चे भाजपल कनेक्शन! -
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वर येत असलेल्या चित्रपटासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, मी ऐकले आहे की, कदाचित याच आठवड्यात 370 वर एक चित्रपट येत आहे. हा चित्रपट कसा आहे, हे मला माहीत नाही. मात्र, चांगलेच आहे, लोकांना खरी माहिती मिळण्यात कामी येईल. आज मी हिम्मत करून लोकांना म्हणालो आहे की, पुढच्या निवडणुकीत भाजपला 370 तर एनडीए ला 400 पार करा. आता जम्मू-काश्मीर एका संतुलित विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.


 

Web Title: Prime Minister Narendra Modi stopped his speech in Jammu after seeing the child lifted up, what did he say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.