पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा घाटावर अडखळून पडले, सुरक्षा रक्षकांनी सावरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 06:08 PM2019-12-14T18:08:02+5:302019-12-14T18:09:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आज कानपूरच्या दौऱ्यावर होते
कानपूर - आज कानपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील गंगा घाटाला भेट दिली. यावेळी गंगा घाटावरील पायऱ्या चढत असताना मोदींचा अचानक तोल गेला आणि ते अडखळून पडले. यावेळी तिथे तत्पर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ मदत करत त्यांना सावरले.
कानपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमामी गंगे प्रकल्पाची समीक्षा केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थीत होते. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गांगा किनारी अटल घाटावरील पायऱ्यांवरून जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. मात्र मोदींना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
#Modi ji fell during his #Kanpur visit today.... pic.twitter.com/mc2q3N6qUv
— Vikas Bahl♡ (@HumorMonger31) December 14, 2019