पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, "पात्र असाल तर लवकर..."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 07:47 AM2021-04-08T07:47:53+5:302021-04-08T07:49:44+5:30
Corona Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी घेतला होता लसीचा पहिला डोस
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवार) दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांना आज भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एम्स रुग्णालयातील परिचारीका निशा शर्मा यांनी त्यांना लस दिली. यावेळी त्यांच्या समवेत परिचारीका पी निवेदा यादेखील उपस्थित होत्या.
दरम्यान, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांनाही लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं. "एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच लसीकरण पूर्ण करा. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा," असं मोदी यावेळी म्हणाले. यापूर्वी त्यांनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.
Delhi: Prime Minister Narendra Modi takes his second dose of #COVID19 vaccine at AIIMS
— ANI (@ANI) April 8, 2021
He received the first dose of Bharat Biotech's COVAXIN on March 1 pic.twitter.com/8Skoware1Z
"आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा दुसरा दिला. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांना भेटण्याची संधी मिळाली हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण राहिल," असं लसीकरणानंतर परिचारीका निशा शर्मा म्हणाल्या.
I have given the second dose of COVAXIN to our Prime Minister Narendra Modi today. He spoke to us. It was a memorable moment for me as I got to meet him and vaccinate him: Sister Nisha Sharma who inoculated PM Modi today. pic.twitter.com/1lkpTU7UHm
— ANI (@ANI) April 8, 2021
सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन व्हर्कर्स, डॉक्टर्स यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ६० वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात आली. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून यात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे.