CoronaVirus News : कोरोनावर मात करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 06:40 PM2021-04-04T18:40:52+5:302021-04-04T18:54:01+5:30

PM Modi High level Meeting on Coronavirus : या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

prime minister narendra modi is taking a high level meeting now to review the covid 19 related issues and vaccination | CoronaVirus News : कोरोनावर मात करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

CoronaVirus News : कोरोनावर मात करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

Next
ठळक मुद्देकोव्हिड -19 (Covid-19) व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक (PM Modi High level Meeting on Coronavirus) बोलावली होती. या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. (prime minister narendra modi is taking a high level meeting now to review the covid 19 related issues and vaccination)
 

कोरोना स्थितीबद्दल चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, कोरोनावर मात करण्यासाठी समुदाय जागरूकता आणि याचा सहभाग सर्वोपरी आहे. कोव्हिड -19 (Covid-19) व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे.

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम सांगितला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोव्हिड नियमांचे पालन आणि लसीकरण जर संपूर्ण प्रामाणिकपणाने आणि बांधिलकीने राबविले गेले, तर या महामारीचा प्रसार थांबविण्यात प्रभावी ठरू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम 
कोरोनापासून बचाव करण्यासाठी 6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये लोकांना 100 टक्के मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी / कामाच्या ठिकाणी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबद्दल माहिती दिली जाईल.

(Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा)

देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ!
भारतात रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 93,249 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. हा नोंद यावर्षी एकाच दिवसात झालेली कोरोनाची सर्वाधिक आहे. तसेच, देशातील संक्रमणाची एकूण संख्या 1,24,85,509 झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 19 सप्टेंबरनंतर कोरोनाची लागण होण्याची ही सर्वाधिक नोंद आहे. 19 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 93,337 रुग्ण आढळले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे 513 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,64,623 इतकी झाली आहे.

(Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या!)

देशातील आठ राज्यांमध्ये झपाट्याने वाढ!
महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. 
देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या 81.42 टक्के इतकी आहे. तर सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
 

Web Title: prime minister narendra modi is taking a high level meeting now to review the covid 19 related issues and vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.